Belagavi

गंगाधर कापसी यांचे मरणोत्तर देह दान

Share

बेळगावच्या राणी चेन्नम्मा नगर येथील रहिवासी, प्रसिद्ध मेडिकल व्होलसेल डिस्ट्रिब्युटर आणि केएलई संस्थेचे आजीवन सदस्य गंगाधर मल्लापा कापसी यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी त्यांचा देह दान केला.

बैलहोंगल येथील डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गंगाधर कापसी यांचा देह काहेरच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजला (जेएनएमसी) वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी दान करण्यात आला.

डॉ. रामण्णावर ट्रस्टचे सचिव डॉ. महांतेश रामण्णावर यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी देहदान केल्याबद्दल कापसी कुटुंबीयांचे मनापासून आभार मानले. दात्याच्या पश्चात तीन मुले व तीन मुली असा परिवार आहे. दरम्यान, नेत्र, त्वचा आणि देह दानाबाबत अधिक माहितीसाठी डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टशी 9242496497 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: