Belagavi

दलित संघटनांतर्फे जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर यांचा सत्कार

Share

बेळगावात विविध दलित संघटनांच्या वतीने आज जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर यांचा सन्मान करण्यात आला.

दलित पँथर संघटना आणि डॉ. बी. आर. आंबेडकर हरिजन शिक्षण संस्थेच्या वतीने बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांचा सन्मान करण्यात आला. हर्षल भोयर यांनी बेळगाव जिल्ह्यातील दलित, वंचित समाजाच्या वसाहतींमध्ये रस्ते, गटारी आदी मूलभूत सुविधांसाठी समर्पक निधी मंजूर करून विकासाची अनेक कामे केली आहेत. त्यांच्या अडचणी सोडवल्या आहेत. या चांगल्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी भोयर यांचा सत्कार करून बोलताना डॉ. महानिंगप्पा कोलकार म्हणाले की, जिल्हा पंचायत सीईओ भोयर हे अनेक चांगल्या योजना राबवित असून गोरगरिबांना देखील मदत करत आहेत. दलितांसह सर्व समाजासाठी ते चांगले काम करत आहेत. अश्या चांगल्या अधिकाऱ्याची नेमणूक जिपं सीईओपदी नियुक्ती केल्याबद्दल आम्ही सरकार आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आभार मानतो. यापुढे ही भोयर यांनी असेच चांगले कार्य करत राहावे असे शुभेच्छा दिल्या.

यावेळी दलित पँथर जिल्हाध्यक्ष आणि डॉ बी आर आंबेडकर हरिजन शिक्षण संस्था अध्यक्ष महानिंगप्पा कोलकार, यल्लप्पा हुदली, साईनाथ कोलकार, कविता कोलकार, सतीश कोलकार, यमनव्वा जोकान्नट्टी, अकबरसाब मुल्ला, चेतन मारिहाळ, सुरेश तळवार, संतोष अवजपगोळ सहित इतर उपस्थित होते

Tags: