बेळगावातील राणी चन्नम्मा चौकाजवळील सरकारी बी एड कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन आज पार पडले.

बेळगावातील सरकारी बी एड कॉलेजच्या 2003-04 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन आणि गुरुवंदना असा संयुक्त कार्यक्रम आज पार पडला. यानिमित्त तब्बल 20 वर्षांनंतर बीएड कॉलेजचे जुने मित्र पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी आपल्या महाविध्यालतीं जीवनातील उजाळा देत एकमेकांची आस्थेने विचारपूस केली. आपल्याला शिकवलेल्या गुरुजनांना पाहून त्यांच्यामुळेच आपण आज जीवनात यशस्वी होऊ शकलो या भावनेने त्यांचा ऊर भरून आला अन त्यांनी गुरुजनांचे मनोमन आभार मानले. लिंगराज कॉलेजचे माजी प्राचार्य बसवराज जगजंपी या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना माजी विद्यार्थी लेखापाल किरण गणाचारी म्हणाले की, आज आमच्या शैक्षणिक संस्थेत शिकलेले सर्व विद्यार्थी आले आहेत, त्या सर्वांचा सहभाग आहे, 20 वर्षांच्या मैत्रीची आठवण करून देणारे, आमच्यासोबत शिकलेले सर्व विद्यार्थी, प्राचार्य आणि सर्व कर्मचारी आज येथे आहेत. या स्नेहसंमेलनात ते आपल्या आयुष्यातील चढ-उतारांबद्दल सांगणार असून नोकरी आणि कुटुंबाविषयी माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानी शासकीय अध्यापक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य व सहसंचालक एम. एम. सिंदुर होते.
लोहिता मजलट्टी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. अप्पाण्णा अंबगी यांनी स्वागत केले. गीता देसुर यांनी प्रास्ताविक केले. किरण गणाचारी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी बी. जी. तुळशीगेरी, नारायणकर, मंजुळा जोशी, एन. के. काळे, पी. एस. हिरेमठ, यू. एन. गंडकट्टी, ए. जे. पाटील 2003-04 चे माजी विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments