Gokak

जिल्ह्यात पुराचा धोका नाही; उद्या केडीपी बैठकीत करणार चर्चा

Share

गेल्या आठवडाभरात बेळगाव जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. मात्र अद्याप पुराचा धोका निर्माण झालेला नाही. तशी चिन्हे दिसताच तातडीने उपाययोजना केल्या जातील. उद्या होणाऱ्या केडीपी बैठकीत आमदारांची मते जाणून घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

बेळगावात रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, जिल्ह्यात पावसाने जोर धरला असला तरी, पूर, महापूर येण्याची स्थिती उदभवलेली नाही. कोयना धरणातून एक लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झाला असला तरी तो सामान्य आहे. दोन लाख क्युसेक्स विसर्ग झाला तर डेंजर झोनमध्ये येतो. पाऊस आणखी आठवडाभर असाच सुरु राहिला तर कदाचित पुराची शक्यता आहे. संभाव्य पुरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांनी आज

नदीपात्रांना भेटी देऊन पाहणी करून आढावा घेतला आहे. त्याशिवाय उद्या सुवर्णसौधमध्ये होणाऱ्या कर्नाटक विकास आढावा बैठकीत जिल्ह्यातील आमदारांची मते जाणून घेऊन काही निर्णय घेण्यात येतील. दुपारी ३ वाजता पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यात भूसंपादनासंबंधी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येईल असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. बाईट.

Tags: