चिक्कोडी शहराच्या डंबळ प्लॉटला लागून असलेल्या निप्पाणी-मुधोळ राज्य महामार्गावर एका थांबलेल्या लॉरीला कॅंटरने धडक दिली . सुदैवाने या अपघातात चालकाचा जीव वाचला.
चिक्कोडी शहराच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कॅंटरची महामार्गाच्या कडेला थांबलेल्या लॉरीला धडक बसल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कॅंटरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. सुदैवाने लॉरी दुरुस्त करणारा मेकॅनिक आणि कॅंटर चालक यांचा जीव बचावला .
चिक्कोडी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रक आणि कॅंटर साफ केले. क्रेनच्या साह्याने लॉरी व कॅंटर बाजूला हटवत असताना , काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. याप्रकरणी चिक्कोडी वाहतूक स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Accident
थांबलेल्या लॉरीला कँटरची धडक : सुदैवाने वाचला कँटरचालक


Recent Comments