पावसाअभावी , नद्या पूर्णत: कोरड्या पडल्या असून घटप्रभा नदीत पाण्याअभावी लाखो मासे मृत्युमुखी पडत आहेत.
मान्सूनचा पाऊस लांबल्याने , नदी नाले कोरडे पडत आहेत . यामुळे जलचरांना याचा फटका बसत असून ,नदी नाल्यामधील मासे आणि जलचर यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे . बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील बीरनगट्टी , नाल्लनट्टी,

बळोबळ, या गावांजवळ नदीत पाण्याविना ढिगा-यांमध्ये मृत माशांचा खच पडला आहे . त्यामुळे गावात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे गावातील लोक भीतीच्या वातावरणात जगत आहेत.
नदी कोरडी पडल्याने , पाण्याअभावी लाखोंच्या संख्येने मासे मरत आहेत . त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटून रोगराई पसरू शकते . पाण्याविना माणसाची देखील अशीच परिस्थिती होऊ शकते त्यामुळे पाण्याचा जपून वापर करा, असे आवाहन इथल्या एका स्थानिकाने केले आहे .

एकंदर मान्सूनच्या पावसाने हुलकावणी दिल्याने , मनुष्यजातीच नाही तर , जलचर आणि प्राणी सुद्धा संकटात सापडले आहेत. लवकरात लवकर पाऊस पडला तरच जनजीवन स्थिर होण्याची शक्यता आहे अन्यथा दुष्काळाच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे .


Recent Comments