Belagavi

बेनकनहळ्ळीत ब्रह्मलिंग मंदिराचा वार्षिकोत्सव उत्साहात महाप्रसादाचा लाभ घेताना भाविक.

Share

बेनकनहळ्ळी येथील ग्रामदैवत ब्रह्मलिंग मंदिराचा वार्षिकोत्सव एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. दुपारी झालेल्या महाप्रसादाचा लाभ गावातील तसेच परिसरातील जवळपास २५ हजार भाविकांनी घेतला.

ब्राह्मलिंग देवस्थान एक जागृत देवस्थान म्हणून या भागांमध्ये प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये सकाळी पहाटेपासून अभिषेक, पूजा, आरती असे विविध कार्यक्रम पार पडले. दुपारी गावातून ब्रह्मलिंग देवाची पालखी वाजतगाजत मंदिराच्या परिसरात येऊन या उत्सवाला प्रारंभ झाला.

मंदिराच्या सभोवती पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पूजा, आरती व गाऱ्हाणा कार्यक्रम झाले. विश्वासराव देवाप्पा पाटील मंदिरातील मुख्य पुजारी म्हणून पूजा करण्यात आली. तर विठ्ठल पाटील यांनी यावेळी गाऱ्हाणा घातला. ज्योतिबा देसुरकर आणि आजी-माजी पंचमंडळी, ग्रामस्थ,

भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी महाप्रसाद वितरणाला प्रारंभ झाला

Tags: