काँग्रेस पक्षच राज्यातील गरीब जनतेला वाचवू शकतो, असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. हुक्केरी शहरात पार पडलेल्या प्रजाध्वनी यात्रेचा शुभारंभ करताना ते बोलत होते
जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करणाऱ्या राज्यातील भाजप सरकारला हटवून हुक्केरी मतदारसंघातील जनतेने ए. बी.पाटील यांना आशीर्वाद देऊन मतदारसंघाच्या विकासात मदत करावी, असे आवाहन सिद्दरामय्या यांनी जनतेला केले. माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा मुख्यमंत्री असताना, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी सभागृहात केली असता, आमचे सरकार नोटा छापण्याची मशीन नाही असे वक्तव्य त्यांनी केले.

ते पाहता त्यांना शेतकऱ्यांची पर्वा नाही असा आरोप त्यांनी केला. भाजप सरकार कंत्राटदारांकडून 40 टक्के कमिशन घेत आहे, कंत्राटदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या भ्रष्टाचारात केंद्र आणि राज्य सरकारचाही हात असल्याचा आरोप सिद्दरामय्यांनी केला.


शेतकऱ्यांना 8 तास वीज देण्यासाठी आणि गरिबांना प्रति व्यक्ती 10 किलो तांदूळ देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून त्यासाठी काँग्रेसला मतदान करण्याची विनंती यावेळी केली. बाईट
माजी मंत्री ए. बी. पाटील म्हणाले, या भागातील मतदारांना परिवर्तन हवे आहे, त्यांनी या निवडणुकीत मला मतदान करून सिद्दरामय्या यांचे हात बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी या मतदारसंघातून ए. बी. पाटील यांची निवड करून मतदारसंघाच्या विकासात सहकार्य करावे, असे केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
आमदार जमीर अहमद यांनी भाषणात, हिंदू मुस्लिम म्हणून समाज फोडणाऱ्या विभाजित राज्यकर्त्यांना मत देऊ नका, तर काँग्रेस सरकारचे यश पाहून मतदान करा अशी विनंती केली.
यावेळी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते डी. टी. पाटील आणि नागप्पाण्णा करजगी यांचा सत्कार केला.

व्यासपीठावर आमदार प्रकाश राठोड, माजी आमदार अशोक पट्टण, श्याम घाटगे, वीरकुमार पाटील, काकासाहेब पाटील, चिक्कोडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, हुक्केरी ब्लॉक अध्यक्ष विजय रवदी, संतोष मुडसी, रेखा चिक्कोडी, रवी कराळे, मौनेश पोतदार आदी उपस्थित होते.
यावेळी हुक्केरी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments