Belagavi

सामूहिक ललितासहस्त्रनाम पठणाचा कार्यक्रम

Share

सर्वाना सुखशांती , उत्तम आरोग्य लाभावे , तसेच मानवी जीवनात सकारात्मक विचार निर्माण व्हावे यासाठी , ३००० महिलांचा , सामूहिक ललिता सहस्त्रनाम स्तोत्र पठणाचा कार्यक्रम आयोजित करून जागतिक रेकॉर्ड केल्याची माहिती , महालक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा विद्यावती चंद्रशेखर गौडर यांनी दिली .

बेळगावमधील , महांतेश नगरातील लव्ह डेल सेंट्रल स्कुलच्या मैदानावर आयोजित केलेल्या ललिता सहस्त्रनाम स्तोत्र पठण कार्यक्रमाची त्या माहिती देत होत्या . त्या म्हणाल्या कि , गेल्या पंधरा दिवसांपासून आम्ही या कार्यक्रमाची तयारी करीत होतो . सर्वाना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे , जनतेमधील नकारात्मकता दूर होऊन , सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी सामूहिक ललिता सहस्त्रनाम स्तोत्र पठणाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले . यामध्ये ३००० महिला सहभागी झाल्या असून , हे एक जागतीक रेकॉर्ड बनले आहे .

यावेळी महिलांनी पिवळ्या कलरच्या साड्या परिधान करून , ललिता सहस्रनामाचे सामूहिक मंत्रपठण केले .

या कार्यक्रमाला , खासदार मंगला अंगडी , महांतेश कवटगीमठ , आ . अनिल बेनके , शंकरगौडा पाटील , मुरगेन्द्रगौडा पाटील , मदनकुमार भैरपणावर , ज्योती चिंडक , रवी पाटील ,कृष्णभट आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते .

Tags: