Belagavi

लिंगायत धर्माला द्या घटनात्मक मान्यता

Share

लिंगायत धर्माला घटनात्मक मान्यता मिळावी तसेच कर्नाटकचे सांस्कृतिक नेते म्हणून सामाजिक प्रणेते, महान मानवतावादी श्री. बसवण्णा यांच्या नावाची घोषणा करण्यासहीत , अन्य मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी , राष्ट्रीय बसव दलाचे बेळगाव शाखेचे जिल्हाध्यक्ष अशोक बेंडीगेरी यांनी केली .

लिंगायत धर्म महासभा तसेच राष्ट्रीय बसवदल बेळगाव शाखेच्या वतीने , आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन दिल्यानंतर ते माध्यमांना माहिती देत होते . राष्ट्रीय बसव दलाचे बेळगाव शाखेचे जिल्हाध्यक्ष अशोक बेंडीगेरी यांनी सांगितले कि, लीनाग्यात धर्मच्या मान्यतेसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला निवेदन पाठवले आहे . नागमोहन दास आयोगाचा अहवाल केंद्र सरकारने फेटाळला ते . त्यामुळे , राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठीनवीन प्रस्ताव सादर करावा.अशी विनंती त्यांनी राज्य सरकारला केली . राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी त्यांचेच सरकार आहे . दोन्ही बाजूचे सरकार तुमचेच आहे . कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील लिंगायत आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकाळात , या आयोगाच्या शिफारशींची परिशीलन करून , केंद्राकडे पाठवावा असे आवाहन केले .

त्याचप्रमाणे कुडलसंगम येथील विश्वगुरू बसवण्णा यांच्या ऐक्य मंडपाला भेट देणाऱ्या पर्यटक तसेच बसवणं प्रेमींकडून , प्राधिकरणाकडून प्रवेश शुल्क आकारले जात आहे . याचे खंडन करून ,प्राधिकरणाकडून करण्यात येणारी वसुली बंद करावी आणि ऐक्य मंडपात मोफत प्रवेश द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली . त्याचप्रमाणे , गुलबर्गा विश्व विद्यालयाला बसवेश्वरांचे नाव देण्यात यावे, अशा विविध मागण्या त्यांनी शासनासमोर मांडल्या.

मागण्यांच्या पूर्ततेस दिरंगाई झाल्यास, आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. 20 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे राज्यातील सर्व बसवदल आणि लिंगायत संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्याची दिला . करणार असल्याचे सरकारला सांगितले.

लिंगायत धर्म महासभेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष महांतेश गुडस म्हणाले की, सिद्धरामय्या सरकारमध्ये यापूर्वीच केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता आणि तो कोणताही योग्य आढावा न घेता परत करण्यात आला होता, हे लिंगायतांच्या रोषास कारणीभूत ठरले आहे . त्यामुळे लिंगायत धर्म महासभा आणि बसव दलाचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. पुन्हा केंद्र सरकारकडे आणि लिंगायत धर्मात अनेक पोटजाती आहेत, त्यांना राज्यात योग्य दर्जा देण्यात यावा, त्यांच्या विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी राष्ट्रीय बसव दल व लिंगायत धर्म महासभेचे नेते एम. एम. गडगली, एस. एस. पाटील, आनंद गुडस, के. शरण प्रसाद, एम. एम. सत्तीगेरी, महांतेश गुड्स , शंकर गडगली, शिवबसव कुकडोल्ली, मल्लिकार्जुन दोड्डमणी, संतोष गुडस, शरण लिंगायत आदी उपस्थित होते.

Tags: