Belagavi

कणबर्गीत कळसारोहण मिरवणूक उत्साहात

Share

कणबर्गी येथील जागृत सिद्धेश्वर मंदिर वास्तुशांती, कळसारोहण मिरवणूक सोहळ्यालाउत्साहात सुरुवात झाली. गावातील लक्ष्मी मंदिर येथून मंदिराच्या कळस मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत महिला, व तरुणांचा लक्षणीय सहभाग होता. माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी नगरसेवक संजय सुंठकर, संजय इनामदार, सिद्धराय सांबरेकर, आप्पाया बिरजे, भावकाना हिरोजी, बळवंत घुगरोटी आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले.

 

आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते मिरवणुकीच्या ट्रॅक्टरचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. या कळस मिरवणुकीत टाळ मृदुंगाचा गजरासह ढोल ताशा व पारंपारिक वाद्यांचा गजर झाला. कुंभार गल्ली, बसवेश्वर गल्ली, मठ गल्ली, पाटील गल्ली, समर्थ गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, ज्योतिर्लिंग गल्ली, सिद्धेश्वर, नगर, करवी गल्ली, गोकाक रोड, कुलकर्णी गल्ली, आदी भागातून मिरवणूक नेण्यात आली . यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता .

पाटील गल्ली, चव्हाट गल्ली मार्गे ही मिरवणूक सिद्धेश्वर डोंगरावर नेण्यात आली
त्यानंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी , गणहोम, पूजा विधी कार्यक्रम पार पडला .
मंगळवारी सकाळी ६:३० ते अकरा पर्यंत वास्तुशांती व कळसारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्घाटन सोहळा, विविध. मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार. आहे. दुपारी १२ नंतर महाप्रसादाचे करण्यात आले आहे .

Tags: