Belagavi

जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेतर्फे रक्तदान शिबीर

Share

सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी निमित्त , जीवन विद्या मिशनच्या बेळगाव शाखेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . सद्गुरुंच्या राष्ट्रहित आणि विश्वशांती या सिद्धांतानुसार समाजहिताच्या दृष्टीने हे शिबीर घेण्यात आले .

रविवारी , जीवन विद्या मिशन तर्फे , के एल इ ब्लड बँकेच्या सहकार्याने , रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . सद्गुरू वामनराव पै यांचे जन्मशताब्दी वर्ष असून , या निमित्ताने , त्यांच्या भक्तपरिवाराकडून वर्षभर राष्ट्रहिताचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत . त्याचाही हा एक भाग म्हणून रक्तदान शिबीर घेण्यात आले .

या शिबिराबद्दल माहिती देताना जीवन विद्या मिशनच्या बेळगाव शाखेचे युवराज यांनी सांगितले कि , सद्गुरुंच्या जन्मशताब्दी निमित्त बेळगाव शाखेकडून वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत . आजच्या रक्तदान शिबिराला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे . वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हाद पै यांचे व्याख्यान देखील आम्ही आयोजित करणार आहोत , सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .

रक्तदान शिबिराच्या आयोजकांपैकी आणखी एकानी सांगितले कि , सद्गुरु वामनराव पै यांच्या राष्ट्रहित आणि विश्वशांतीचा सिद्धांतानुसार , नवीन वर्षाचे औचित्य साधून आम्ही हे शिबीर आयोजित केले आहे . यासाठी केएलई ब्लड बँकेचे सहकार्य लाभले आहे . यावेळी त्यांनी रक्तदानाचे महत्व सांगून रक्तदात्यांबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त केली. या रक्तदान शिबीर पुरुषांसोबत महिलांनी देखील रक्तदान केले .

Tags: