सर्वच पक्षात आमच्या पंचमसाली समुदायाच्या नेत्यांचा सेटअप आहे. त्यामुळे पंचमसाली समाजाला आरक्षण नक्कीच मिळेल असा आशावाद विजापूरचे आमदार व माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी व्यक्त केला.

बेळगावातील गांधी भवन येथे आज सोमवारी पंचमसाली लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत बोलताना माजी आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ म्हणाले की, आमच्या समाजाचे नेते प्रत्येक पक्षात आहेत. 19 डिसेंबरच्या अंतिम मुदतीच्या आत तेच आरक्षण मिळवून देतील. कारण आपल्या समाजातील नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांना सेटअप केला आहे.

यावेळी कुडलसंगम पिठाचे बसवजयमृत्युंजय स्वामीजी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी, माजी मंत्री ए. बी. पाटील, माजी आमदार व्ही.व्ही.पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments