भारताला संविधान देणाऱ्या आंबेडकरांबद्दल मुलांना शिकवण्याऐवजी गांधीजींना गोळ्या घालून मारणाऱ्यांबद्दल का शिकवायचे ? असा टोला जेडीएसचे राज्याध्यक्ष सीएम इब्राहिम यांनी सरकारला टोला लगावला .

गोकाक येथे जेडीएस कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जेडीएसचे राज्याध्यक्ष सी एम इब्राहिम यांनी पत्रकार परिषद घेतली . यावेळी बोलताना त्यांनी , मोदी आणि सोनिया गांधी कोण आहेत याचा धडा शिकवा. ही आमची भूमी, आमचे पाणी, आम्ही कन्नडीग,आणि आम्हाला महादयीच्या पाण्यासाठी भीक मागावी लागतेय . आमची ही भूमी जिथे कित्तूर राणी चन्नम्मा , संगोळी रायण्णा यांसारख्या लोकांनी इंग्रजांना माती चारली .
भारताला संविधान देणाऱ्या आंबेडकरांबद्दल मुलांना शिकवण्याऐवजी गांधीजींना गोळ्या घालून मारणाऱ्यांबद्दल का शिकवायचे ? असा टोला जेडीएसचे राज्याध्यक्ष सीएम इब्राहिम यांनी सरकारला टोला लगावला .
ते म्हणाले की, लोकांचा जेडीएसवरील विश्वास उडाला आहे, लोकांनी आम्हाला आघाडीचे सरकार बनवण्याचीसंधी दिली नाही . पण जेडीएस पक्षाचे एकच सरकार बनवायचे हे जनतेला ठरवू द्या.
मोदींनी ना खाऊंगा , ना खाने दूंगा सोबत ‘जाने दूंगा’ म्हटल्यावर मल्ल्यासारखे लोक पुन्हा फिरकले नाहीत, असे ते म्हणाले.
यावेळी इब्राहिम यांनी रमेश जारकीहोळी यांच्या जेडीएस पक्षप्रवेशाबद्दल माहिती दिली .

Recent Comments