गोकाक तालुक्यातील भ्रष्टाचार तसेच तालुका प्रशासनाच्या अपयशाविरोधात कर्नाटक राज्य रयत संघटना तसेच हसीरू सेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे.

या संदर्भात रविवारी , गोकाक येथे पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली . सोमवारी गोकाक शहरातील बसवेश्वर सर्कल पासून , तहसीलदार कार्यालयापर्यंत कर्नाटक राज्य रयत संघटना तसेच हसीरू सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे . त्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे . अशी माहिती कर्नाटक राज्य रयत संघटना तसेच हसीरू सेनेचे राज्य उपाध्यक्ष शिवानंद मुगळीहाळ, यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष राघवेंद्र नायक यांनी याबद्दल माहिती देताना ,अधिकारी शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करीत नसल्याने हा सत्याग्रह पुकारण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत राज्य उपाध्यक्ष शिवानंद मुगळीहाळ, गणेश एलीगार, जिल्हाध्यक्ष राघवेंद्र नाईक ,तालुका अध्यक्ष मंजुनाथ पुजारी , कुमार तिगडी ,सन्नाप्पा सनदी , अडिवेप्पा यांच्यासह अनेक शेतकरी नेते सहभागी झाले होते .


Recent Comments