Belagavi

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते सांबरा येथे काँक्रीट रस्ताकामाचे भूमिपूजन

Share

बेळगाव तालुक्यातील सांबरा गावातील गणेश नगरात येणाऱ्या सर्व गल्लीबोळातील रस्ते विकसित करण्यासाठी ५० लाख रुपये अनुदान मंजूर करून यातून बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँक्रीट रस्त्याच्या कामाला चालना दिली.

सांबरा गावात यापूर्वी 80 लाख रुपये मंजूर करून रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली होती. आज उर्वरित रस्त्यांची माहिती अद्ययावत करून या सर्व रस्त्यांच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. एकूण 1.30 कोटी रुपये खर्चून हे रस्ते बांधण्यात येत असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नागेश देसाई, गावातील ज्येष्ठ, संबंधित गल्लीतील रहिवासी, स्थानिक लोकप्रतिनिधी, निकटवर्तीय, कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

legislator-laxmi-hebbalkar-drive-to-sambra-road-work/