पंचमसाली आरक्षणाचा लढा सुरूच राहणार असून येत्या रविवारी गोकाक येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात भव्य लिंगायत पंचमसाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असे कुडलसंगम पंचमसाली पीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी सांगितले.

व्हॉईस : बेळगावात गांधी भवन येथे आज गुरुवारी शहरातील बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी सांगितले की, सरकारने पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण द्यावे यासाठी आमचा लढा सुरुच राहील. अनेकवेळा आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन सरकारने आमच्या समाजावर अन्याय केला आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. बाईट
12 डिसेंबर रोजी बंगळुरू येथील विधानसौधला सुमारे 25 लाख पंचमसाली घेराव घालणार आहेत. या भव्य आंदोलनाचा एक भाग म्हणून गोकाक येथे रविवारी भव्य पंचमसाली मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सरकारने चार वेळा आश्वासने देऊनही आमची मागणी पूर्ण केलेली नाही. गोकाक हे संपूर्ण राज्याचे शक्तीकेंद्र असून या भागात पंचमसाली समाज मोठ्या संख्येने आहे. लोकांच्या स्वयंप्रेरणेने मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात पंचमसाली समाजाचे प्रमुख नेते आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ, खासदार इरण्णा कडाडी, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, विजयानंद काशप्पनावर यांच्यासह आपल्या समाजातील महत्त्वाचे राजकीय नेते सहभागी होणार असल्याची माहिती बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी दिली. बाईट
पत्रकार परिषदेला माजी मंत्री ए. बी. पाटील, गुंडू पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments