Vijayapura

कुरिअर सेंटरमध्ये चोरी : चोरटे सीसीटीव्हीत कैद

Share

कुरिअर सेंटरचे कुलूप तोडून चोरट्याने रोख रक्कम चोरून नेल्याची घटना विजापूर शहरातील दात्री मशिदीसमोर घडली.

डीटीडीसी कुरिअर या दुकानाचे मालक शब्बीर यांच्या दुकानात चोरी झाली आहे. चोरट्याने दुकानातील ३१ हजारांची रोकड चोरून पळ काढला. चोरट्याने केलेल्या या चोरीचे फुटेज सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गोलघुमट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Tags:

vijapur robbery in shop