Belagavi

काकती येथे जल्लोषात श्री दुर्गामाता दौड साजरी

Share

नवरात्रीच्या सातव्या दिवशी आज बेळगाव तालुक्यातील काकती गावात अत्यंत उत्साह आणि जल्लोषात श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली.

गल्लीबोळात आकर्षक रांगोळ्या, रस्त्यांच्या वेशीवर हिंदू धर्माचे प्रतीक असलेला डौलाने फडकणारे भगवे ध्वज, भगव्या पताका, फडकणारे कन्नड ध्वज, रस्त्यावर शिवरायांचा इतिहास सांगणारे सजीव देखावे … होय, बेळगाव तालुक्यातील राणी चन्नम्मा यांचे मूळ गाव असलेल्या काकती गावात हे दृश्य पाहायला मिळाले. दरवर्षी प्रमाणे बेळगाव तालुक्यातील काकती गावात श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आबालवृद्ध मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात पूजन व प्रेरणामंत्राच्या जपाने ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या धारकऱ्यांनी दौडला सुरुवात केली. काल रात्रीपासून तरूणांनी रस्त्यावर सजावट केली होती तर महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या.

जय भवानी, जय शिवाजी, कित्तूर राणी चेन्नम्मा की जय अशा घोषणांनी दौडचा मार्ग दुमदुमून गेला. मरगाई गल्ली येथील तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. फटाक्यांची आतषबाजी, महिलांची पारंपरिक आरती आणि मोठ्या भक्तिभावाने दौडचे स्वागत करण्यात आले. फ्लो
पदाधिकार्‍यांना मिठाई देवून पुष्पवृष्टी करून जल्लोष करण्यात आला. दौड, शास्त्रीनगर, भाजी मार्केट, यमनापूर गल्ली, लक्ष्मीनगर यासह विविध मार्गांनी फिरून छत्रपती शिवाजी गल्ली येथे पोहोचली. तेथे शिवतीर्थावर ध्येय मंत्रपठण करून दौडीची सांगता झाली.

Tags:

belgaum kakati shri durgamata doud