Belagavi

हुदली पीकेपीएसची निवडणूक बिनविरोध

Share

केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेवरून गुरूवारी झालेल्या हुदली प्राथमिक कृषी पत संस्थेच्या अध्यक्षउपाध्यक्षपदाची निवडणुक अरविंद कारजी यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली.

बेळगाव तालुक्यातील हुदली गावच्या प्राथमिक कृषी पत  सहकारी संस्थेच्या नवीन अध्यक्षपदी भीमप्पा कल्लाप्पा माळगी व निर्मला चन्नबसप्पा माळगी यांची एकमताने निवड करण्यात आली.

वीरूपाक्षी मजगी, राजू मोदगी, चन्नबसू पवडी, सिद्धराम माळगी, चंद्रू कुंदरगी, अदिवेप्पा मल्लुरी, यल्लाप्पा हरिजन, रियाझ बाळेकुंदरगी, सुरेश कम्मार, अर्जुन बडकली, निर्मला गिडगेरी, अदिवेप्पा माळगी, चन्नबसू माळगी, बसु माळगी, बसवराज, तामाजी तावडे आदी उपस्थित होते.

Tags: