खानापूर तालुक्यातील लिंगनमठ गावात शासकीय कन्नड शाळा वाचविण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी एकदिवसीय संप केला.

लिंगनमठ गाव हे सुमारे पाच हजार लोकसंख्येचे एक संपन्न गाव आहे. खानापूर तालुक्यातील हे सर्वात दुर्गम गाव आहे. येथील शासकीय कन्नड मुलांच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत सुमारे 200 विद्यार्थी शिकत आहेत.

विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फक्त पाच खोल्या होत्या. यामध्ये जीर्ण अवस्थेत असलेल्या २ खोल्या पाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खोल्या नसताना झाडाखालीच धडे गिरवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन खोल्या बांधण्यासाठी ग्रामस्थ व शाळा प्रशासनाने सुमारे सहा वर्षांपासून शिक्षण खात्याला विनंती करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा युवा संघटना, चेन्नम्मा कित्तूर राज्य युनिट आणि इतर कन्नड समर्थक संघटनांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. कन्नड शाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या जागेत दुसरी इमारत बांधून कन्नड शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या दोन खोल्या तातडीने बांधून कन्नड शाळा वाचविण्याचे काम करावे अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
लिंगनमठ गावात उर्दू शाळेसाठी खोल्या बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
कन्नड शाळेला का खोल्या मंजूर केल्या जात नाहीत असा सवालग्रामस्थांचं आहे.
कन्नड शिकणाऱ्या मुलांच्या एका डोळ्याला लोणी आणि दुसऱ्या डोळ्याला चुना असा अन्याय शिक्षण विभाग आणि सरकार करत आहे.
कन्नड शाळेच्या अस्तित्वासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने शाळा खोल्यांचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
त्यामुळे आवश्यक शाळा खोल्या तातडीने बांधून कन्नड शाळा वाचविण्याचे काम करावे अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


Recent Comments