काळानुसार व्यवस्था बदलत आहे. कारागृहातील कैदीही आता हायटेक झाले आहेत. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या पालिका सदस्याने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाग घेऊन आपल्या प्रभागातील समस्या सांगितल्याची घटना घडली आहे.

होय, बेळगावच्या हिंडलगा कारागृहातील संकेश्वर नगरपालिकेच्या प्रभाग 14चे भाजप सदस्य उमेश कांबळे यांनी न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे सर्वसाधारण सभेला हजेरी लावली. नगरपरिषद सदस्य असलेल्या उमेश कांबळे याला आठ महिन्यांपूर्वी संकेश्वर शहरातील एका महिलेवर देशी पिस्तुलाने गोळ्या घालून तिचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. खुनाच्या आरोपाखाली बेळगाव हिंडलगा कारागृहात असलेला उमेश कांबळे कारागृहातून व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीत सहभागी झाला होता. न्यायालयाच्या परवानगीने व्हिडीओ कॉलद्वारे सभेला उपस्थित असलेला आरोपी उमेश कांबळे याने आपल्या प्रभागाची कामे बैठकीत होत नसल्याचे व्हिडिओ कॉलद्वारे सांगितले. या घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे एवढे मात्र नक्की.



Recent Comments