Belagavi

बेळगावात श्री खंडोबा मंदिराचा पायाभरणी

Share

बेळगावातील गणाचारी गल्ली येथील नव्याने बांधण्यात येणाऱ्या खंडोबा मंदिराचा पायाभरणीभूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला.

होय, बेळगावातील गणाचारी गल्ली येथील बकरी मंडईतील श्री बिरेश्वर मंदिर परिसरात हिंदू खाटीक समाजातर्फे श्री खंडोबा मंदिर बांधण्यात येणार आहे. या नियोजित मंदिराचा पायाभरणी समारंभ काल बुधवारी धार्मिक विधींसह उत्साहात पार पडला. पांगुळ गल्लीचे ज्येष्ठ पंच अरुण मुतगेकर यांच्याहस्ते पायाभरणी करण्यात आली.

नुकतेच बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांच्याहस्ते या मंदिरासाठी भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी पायाभरणी करण्यात आली. बहुजन समाजाचे श्री खंडोबा हे आद्य कुलदैवत असून अनेक भक्तांच्या सहकार्यातून या मंदिराची उभारणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन हिंदू खाटीक समाजाचे अध्यक्ष उदय घोडके यांनी यावेळी केले. याप्रसंगी अरुण मुतगेकर, दुबई येथे राहणारे यल्लाप्पा महादेव अष्टेकर, शंकर कांबळे, लक्ष्मण सुरेकर आदींनी मंदिरासाठी देणग्या जाहीर केल्या. याप्रसंगी सतीश घोडके, लक्ष्मण भोपळे, राजू कांबळे, प्रकाश महागावकर, डॉ. चंद्रकांत बेळगावकर, अंबिका घोडके, निर्मला घोडके, सविता कांबळे, ज्योती घोडके, वैशाली घोडके व हिंदू खाटीक समाजाचे अन्य भाविक उपस्थित होते.

Tags: