नोकर भरतीमधील गैरव्यवहार दिवसेंदिवस वाढत चालल्याचे निदर्शनात येत असून आता रेल्वे विभागातील पदोन्नती परीक्षेबाबत आणखी एक गंभीर आरोप पुढे आला आहे.

अशापद्धतीने रेल्वे परीक्षेला विरोध करणारे रेल्वे कर्मचारी, फेरपरीक्षेचा आग्रह करणारे उमेदवार, परीक्षेमध्ये बेकायदेशीर बाब उघडकीस आल्याने व्यक्त होणारी कर्मचाऱ्यांची नाराजी हि सारी दृश्ये हुबळी रेल्वे व्यवस्थापकीय संचालक कार्यालयासमोरील आहेत.
राज्यात सरकारी पदासाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेतील बेकायदेशीर गोष्टी पुढे येत असतानाच हुबळी रेल्वे विभागात पुन्हा एक नवा आरोप पुढे आला आहे. रेल्वे गुड्स ट्रेन मॅनेजर सीईटी प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून जीटीएम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हुबळी नैऋत्य रेल्वे जी एम कचेरी समोर आंदोलन छेडले आहे. रेल्वे विभागातील पदोन्नती साठी होणाऱ्या सीईटी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. ४ सप्टेंबर रोजी जीटीएल स्पर्धा परीक्षा ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आल्या होत्या. परीक्षा सुरु होण्यापूर्वीच व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका मिळाल्याचा आरोप करण्यात आला असून सदर परीक्षा १४७ जागांसाठी होणार होत्या. यासाठी ४६८५ उमेदवार परीक्षेसाठी हजर होते. यापैकी २०० उमेदवारांनी ९५ ते ९६ टक्के गुण मिळविले असून या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. ()
सदर प्रकारची कसून चौकशी आणि तपास करावा, असे आवाहन नैऋत्य रेल्वे जी एम यांच्याकडे करण्यात आले असून फेरपरीक्षा घेण्याची मागणीही उमेदवारांनी केली आहे. परीक्षा होऊन आठ दिवस झाले असून प्रश्नपत्रिका फुटल्याची बाब काही विद्यार्थ्यांना समजली असून या विद्यार्थ्यांनी तक्रार करत तपास घेण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी पारदर्शक तपास केला जाईल, असा विश्वास सीपीआर व अनिल यांनी व्यक्त केला आहे. ()
पीएसआयभरती यासह अनेक विभागातील रिक्त पदांसाठी झालेल्या परीक्षेतील गैरव्यवहाराच्या बातम्या ताज्या असतानाच पुन्हा हुबळीतील हा प्रकार पुढे आला असून याबाबत रेल्वे विभागाने योग्य तपास आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Recent Comments