बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोळवी गावात शेताला जाताना ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

गोकाक तालुक्यातील कोळवी गावातील 25 दुंडाप्पा मालदिन्नी हा तरुण 09 सप्टेंबर रोजी शेतात जाण्यासाठी ओढा ओलांडताना पाण्यात वाहून गेला होता. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे ओढ्याला पूर आला होता.
दुथडी भरून वाहणारा ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो वाहून गेला होता. त्यानंतर अग्निशमन दलाने त्याचा मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबवली. सलग तीन दिवस मोहीम राबवल्यानंतर अखेर आज त्याचा मृतदेह सापडला.
आज बेनचीनमर्डी – कोळवी मार्गाच्या दरम्यान मृतदेह आढळून आला. गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments