बेळगाव तालुक्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तुम्मरगुद्दी गावातील अनेक घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
तुम्मरगुद्दी गावात 10-12 घरांची पडझड झाली असून रहिवाशांचे हाल होत आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घरे गमावलेल्या कुटुंबांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला आणि लवकरात लवकर शासनाकडून योग्य ती भरपाई मिळवून देण्याचे काम हाती घेण्याचे आश्वासन दिले.यावेळी गावातील नेते व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.



Recent Comments