Belagavi

हेस्कॉम अधिकाऱ्यांचा स्वागत व निरोप समारंभ

Share

कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड, बेळगावचे अधीक्षक अभियंता श्रीकांत एम. ससालट्टी आणि अब्दुल रहीम एस यांना अधीक्षक अभियंता या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यानिमित्त त्यांना आज निरोप आणि स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​अधीक्षक अभियंता श्रीकांत एम. ससालट्टी यांची हेस्कॉम हुबळी विभागाला बढतीवर बदली झाली आहे. तर अब्दुल रहीम एस. यांची अधीक्षक अभियंतापदी बढती मिळाली आहे. यानिमित्त या अधिकाऱ्यांचा कर्मचारी आणि कंत्राटदाराकडून निरोप आणि स्वागत समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता.

मुख्य अभियंता नागराज, शिवाजी एस खरे, संतोष कुमार वाय. के., पी. बी. पाटील, शारदा अंकलगी, कृष्णा हल्याळ, सदानंद कुरेर, एच. जी. हम्मण्णावर, एस. सी. कोटबागी, ​​राजेंद्र देसाई यांच्यासह ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Tags: