विजापूर तालुक्यातील नागठाण गावात नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे आज जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

भूमिपूजनासाठी आलेले मंत्री गोविंद कारजोळ आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे नागठाण ग्रामस्थांनी दुचाकी रॅली काढून भव्य स्वागत केले.

नवीन बसस्थानक इमारतीच्या भूमिपुजनानंतर बोलताना मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले की, नागठाण गावात 110 केव्ही वीज केंद्राची मागणी आहे, मी यापूर्वी मंत्री असताना नागठाणा गावात 33 केव्ही वीज केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते, आणि ते 110 केव्ही पॉवर स्टेशनमध्ये अपग्रेड करण्यासाठी प्रयत्न केले जातील. बसस्थानक बांधले जावे, अशी या भागातील जनतेची अनेक दिवसांपासूनची मागणी होती, त्यामुळे आज आम्ही बसस्थानकाचे भूमिपूजन केले असून, 1 कोटी 50 लाख रुपये खर्चून हे काम होणार आहे.
यावेळी माजी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, स्थानिक भाजप नेते आदी उपस्थित होते.


Recent Comments