बेळगावात गेल्या तीन–चार दिवसांपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तशातच घरे कोसळण्याचे सत्र पुन्हा सुरु झालं आहे. अनगोळ वाद कंपाऊंड येथील एक दुमजली घर आज सकाळी कोसळल्याची घटना घडली.

होय, गेल्या बेळगाव परिसरात तीन-चार दिवसांपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. लोकांना घराबाहेर पडता येत नाही आणि घरात राहिल्यास घर कधी कोसळेल,

अशी भीती आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागातील घरांची पडझड झाली आहे. तशातच आज, सोमवारी अनगोळमधील वाडा कंपाऊंड येथील अशोक बेंडीगेरी यांचे दुमजली घर पूर्णपणे कोसळले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तसेच शहरातील विविध भागात सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. मुसळधार पावसाने लोक हैराण झाले आहेत.


Recent Comments