दरवर्षीप्रमाणे यंदाही मानव बंधुत्व वेदिकेतर्फे नागपंचमीचे रूपांतर बसव पंचमी म्हणून साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली.

गोकाक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली आहे. विश्वगुरू संत बसवेश्वर महाराजांनी १२ व्या शतकात अंधश्रद्धा आणि अज्ञानापासून मुक्ती मिळविण्याचा मार्ग दाखविला, परंतु आजही
लोक अंधश्रद्धा आणि अज्ञानात बुडाले आहेत. यात परिवर्तन आणण्यासाठी आम्ही हा प्रयोग राबवत आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमीच्या ऐवजी बसव पंचमी आपण साजरी करणार आहोत. पुरोगामी विचारवंत आणि अनेक मठाधीशांनी मागील वर्षी बसव पंचमी साजरी केली असून यंदाही हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. ()
सिद्धरामय्या यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची तयारी सुरु असून हा एक ऐतिहासिक आणि मोठा कार्यक्रम होणार असल्याचे ते म्हणाले, सदर कार्यक्रम दावणगेरे येथे आयोजित करण्यात आला असून बेळगाव जिल्ह्यातील जनताही या कार्यक्रमात मोठ्याप्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती जारकीहोळी यांनी दिली. ()
१५ ऑगस्ट रोजी बंगळूरमध्ये १ लाख जनसंख्या घेऊन राष्ट्रध्वज हाती घेऊन भव्य पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे. भाजपाला कोणत्याही पद्धतीने तिरंगा फडकविण्याचे अधिकार नाही. त्यांच्याकडे स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्यांचे एकही उदाहरण नाही. भाजप हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याची टीका सतीश जारकीहोळी यांनी केली. ()
गोकाकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश जारकीहोळी यांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


Recent Comments