बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द या गावात श्रीराम कृष्ण हरी सभाभवनात श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजना आणि रुडसेट संस्थेच्या सहयोगाने २ दिवसीय औद्योगिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची सांगता आज झाली.

यावेळी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास योजनेचे प्रादेशिक संचालक दुग्गेगौडा यांनी स्वयंरोजगार हा स्वावलंबी जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे मत व्यक्त केले. मुलींनी चार भिंतींच्या मधोमध बंदिस्त राहू नये. हे सर्व सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. काम करणार्या हातांना काम दिले तर ते स्वतंत्रपणे जगू शकतील, तेव्हा बदल शक्य असल्याचे ते म्हणाले.

यानंतर प्रशिक्षित महिला सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्याचवेळी प्रशिक्षित महिला सदस्यांपैकी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणात समस्या व आव्हाने कशी सोडवायची हे पटवून दिले. अंबानींच्या जीवनकथेवरचा चित्रपट देखील या प्रशिक्षणादरम्यान दाखविण्यात आला असून हे प्रशिक्षण आमच्यासाठी खरोखर उपयुक्त ठरले असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थीनी व्यक्त केली. 
प्रशिक्षणादरम्यान महिला सदस्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सभासदांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. जिल्हा संचालक प्रदीप शेट्टी, तालुका नियोजन अधिकारी नागराज, युनियन अध्यक्षा सावित्री रजपूत, तांत्रिक प्रबंधक गीता चिक्कमठ, समन्वयक सुरेखा कोळी, विभागीय पर्यवेक्षक वैशाली पठगार, कृषी पर्यवेक्षक सतीश गौडर, सेवा प्रतिनिधी गौरम्मा जंगम्मा व इतर स्वयंरोजगार सदस्यांनी सहभाग घेतला.


Recent Comments