बेळगावच्या एनके क्लासच्या सीबीएसई दहावीच्या अनेक विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे.

बेळगावच्या अंजनेय नगरातील एनके क्लासीस ९ वर्षांपासून एस नरेंद्रकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विध्यार्थ्यांना चांगले यश मिळवून देऊ शकला आहे. सीबीएसई आणि राज्य एसएसएलसी सिलॅबस येथे शिकवले जातात. येथील विध्यार्थ्यानी चांगला निकाल आणून एनके क्लासचे नाव उंचावले आहे. यंदाच्या दहावी परीक्षेत ऑल इंडिया चौथा क्रमांक पटकावलेली द्राक्ष्यारपु हिने ९९.४% तसेच नमीराहुसेन हिने ९९.००% शांभवी हिने ९२ % गुणांसह अनेक विध्यार्थ्यानी चांगले यश मिळवले आहे.

शनिवारी सायंकाळी क्लासमध्ये या सर्व गुणी विध्यार्थ्यानी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी नमीराहुसेन आणि शांभवी म्हणाल्या की, त्या लव्हडेल सेंट्रल स्कूलमध्ये शिकत असून येथे शिकवणी घेत आहे. एनके क्लास जॉईन केल्याने आमच्यात खूप काही सकारात्मक बदल झाले. चांगले निकाल लागायला नरेंद्रकुमार सर आणि येथील शिक्षकांचे श्रम कारणीभूत आहेत. त्यांची शिकवण खूप चांगले आहे.
नमीराचे वडील डॉ. हुसेन म्हणाले, माझ्या मुलीला एक्स्ट्रा क्लास लावला तरी अभ्यासात मन रमत नव्हते. पण हा क्लास जॉईन केल्यावर तिची अभ्यासात रुची वाढली. आता तिने दहावीमध्ये ९६% गुण मिळवले आहेत. ही अभिमानाची बाब आहे.

यावेळी मागील वर्षाची विध्यार्थीनी प्रियांका कुलकर्णी आणि सनोबर म्हणाल्या की, आता आम्ही बारावीला आहोत. पण येथे आम्ही शिकून दहावीत चांगले गुण मिळवलेत म्हणूनच आम्हाला आता सोपे झाले आहे.
चांगले शिक्षक, चांगल्या प्रशिक्षणाने विध्यार्थ्यांना घवघवीत यश मिळू दे आणि बेळगावचे नावही उंचवावे हीच एनके क्लासच्या विध्यार्थ्यांना आमच्या सदिच्छा.


Recent Comments