बेळगाव तालुक्यातील हुंचानट्टी या गावात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी आपल्या समाजासाठी स्मशान भूमीची सोय करून देण्यात यावी, असा आग्रह जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केला आहे.

हुंचानट्टी ग्रामस्थ आणि वकिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडत मुस्लिम समाजासाठी स्मशानभीची सोय करून देण्याची विनंती केली.
हुंचानट्टी गावातील टिपू सुलतान नगर, अर्षत मोहाला, अमन मोहल्ला, जयनगर यासह कलानगर पाचवा क्रॉस येथे १२ हजार मुस्लिम समुदाय वास्तव्यास आहे. येथील मुस्लिम समाजाला स्मशानभूमीची सोय नाही. यामुळे येथील मुस्लिम समाजाला स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, पिरनवाडी येथील गायरान जमिनीवर स्मशानभूमी मंजूर व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि वकिलांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, यासीन पटवेगार, अतिक सैय्यद, इस्माईल सेठ आदींसह हुंचानट्टी येथील मुस्लिम समुदायातील नागरिक उपस्थित होते.


Recent Comments