येत्या १५ ऑगस्ट रोजी बेळगाव महानगरपालिकेवर भाजप महापौर राष्ट्रध्वज फडकावतील असा ठाम विश्वास बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केलाय.

गुरुवारी बेळगावमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापौर उपमहापौर निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री आणि ऍडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा झाली असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. १२ ऑगस्ट पर्यंत महापौर उपमहापौर पदावर नियुक्ती होईल, तसेच १५ ऑगस्ट रोजी बेळगाव मनपावर भाजपचा महापौर झेंडा फडकावेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माजी मुख्यमंत्री आणि आजी मुख्यमंत्र्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला सुविधा देणार असल्याचे सांगितले आहे. येत्या काही दिवसात नक्कीच मागण्या मान्य पूर्ण होतील. सरकार यासह सर्व समाजांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष पुरविणार असून अधिक अनुदान मिळविण्यासाठी जिल्ह्यातील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचेही अभय पाटील म्हणाले.
बेळगाव महानगरपालिकेचे सभागृह महापौर उपमहापौरांच्या प्रतीक्षेत बऱ्याच कालावधीपासून रेंगाळत आहे. महापौर उपमहापौर निवडी नंतर बेळगावच्या विकासात भर पडेल अशी आशा बेळगावकरांना आहे. आता आ. अभय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या महिनाभरात महापौर उपमहापौर निवड होईल, अशी आशा आहे.


Recent Comments