राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आघाडी घेतल्यानंतर बेळगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.

होय, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड होणार हे जवळपास निश्चित झाले. मतमोजणी प्रक्रिया सुरू असून द्रौपदी मुर्मू यांनी आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. द्रौपतीने मुर्मू यांची प्रतिमा धरून विजयोत्सव साजरा केला. स्वतः आ. अभय पाटील यांनीच ढोल वाजवला. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

यावेळी बोलताना आ. अभय पाटील यांनी सांगितले की, आदिवासी समाजातील महिला देशाची राष्ट्रपती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे संपूर्ण देश आनंदोत्सव साजरा करत आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती होणे ही अभिमानाची बाब असल्याबद्दल आनंद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप नगरसेवक गिरीश धोंगडी, सारिका पाटील, नितीन जाधव यांच्यासह भाजपचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments