वकिली व्यवसाय हा अत्यंत आदरणीय व पवित्र आहे असे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मुरलीधर पै यांनी सांगितले.

प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मुरलीधर पै यांनी बुधवारी कर्नाटक लॉ इन्स्टिट्यूटच्या राजा लखम गौडा लॉ कॉलेजमध्ये आयोजित शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी जिमखाना युनियनचे उद्घाटन केले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, सध्या कायद्याच्या क्षेत्रात खूप बदल झाले आहेत.

या संदर्भात अशिलाला धीर देण्याचे काम वकील करत आहेत. कायदा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण रूजले पाहिजेत. भविष्यात चांगली व्यक्ती म्हणून समाजात त्यांची ओळख व्हावी, असे व्यक्तिमत्व घडवा असा कानमंत्री त्यांनी यावेळी दिला. मेहनती आणि चांगल्या वागणुकीसाठी विद्यार्थ्यांची समाजात ओळख झाली पाहिजे. भावी कारकिर्दीत मनापासून गुंतले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. आरएल लॉ कॉलेजला मोठा वारसा लाभला आहे. संस्थेला कायद्याचे विद्यार्थी घडवण्याची मोठी पार्श्वभूमी आहे आणि ही अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी या संस्थेचा गौरव वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना राजा लखम गौडा विधी महाविद्यालयाच्या संचालन समितीचे अध्यक्ष वकील एम.आर.कुलकर्णी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास केला पाहिजे. मेहनतीचे फळ मिळते. त्यासाठी अभ्यास करावा, असे ते म्हणाले.
महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण अधिकारी अमित जाधव यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. आर.एल. लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए.एच. हवालदार यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून देऊन महाविद्यालयाचा इतिहास आणि यशाबद्दल सांगितले. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.


Recent Comments