आषाढ, श्रावण महिना आला की, ग्रामदेवतांच्या जत्रा एकापाठोपाठ एक येतात. दुर्गाम्मा, मरगम्मा, हुलीगेम्मा, कोन्तेम्मा अशा वेगवेगळ्या देव-देवतांच्या जत्रा–यात्रा भरतात. विजापुरमध्ये अशाचप्रकारे 2 वर्षांनंतर श्री दुर्गादेवी जत्रा महोत्सव सुरू आहे.

आषाढ-श्रावणात महिन्यात जत्रा-यात्रांची कमी नसते. एकापाठोपाठ त्या येत राहतात. याचप्रकारे आषाढ महिन्यात विजापूर शहरातील पोलीस मुख्यालयासमोरील दुर्गादेवी मंदिरात पाच दिवस दुर्गादेवी जत्रा महोत्सव भव्य पद्धतीने संपन्न होणार आहे.
गेल्या 70 वर्षांपासून गोंधळी समाज हा जत्रा महोत्सव साजरा करतोय. गेल्या तीन वर्षांपासून कोरोना संकटामुळे ही जत्रा रद्द करण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाल्यामुळे पाच दिवस जत्रेत दररोज महाप्रसाद वाटप, सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. दुर्गादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे पूजासाहित्य, फुले व नारळ विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे.



Recent Comments