विजापूरमध्ये गेल्या ११ वर्षांपूर्वी झालेले ऑनर किलिंगचे प्रकरण उघडकीस आले असून एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटावी अशी कहाणी या खूनप्रकरणातून समोर आली आहे. संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक करून तुरुंगात टाकले आहे.

विजापूर शहरातील बसवराज ममदापुर यांची मुलगी प्रियांका दानेश्वरी हीच विवाह निडगुंडी तालुक्यातील राजनाळ गावातील हुच्चप्पागौड पाटील याच्याशी २००८ साली झाला होता. लग्नानंतर सर्व काही सुरळीत होते. मात्र काही दिवसानंतर पती पत्नीमध्ये वाद विवाद सुरु झाले आणि यादरम्यान प्रियांका घर सोडून निघून गेली. आपल्या माहेरी येऊन आपण आपल्या पतीसोबत संसार करणार नसून आपले दुसऱ्यावर प्रेम असल्याचे प्रियंकाने कुटुंबियांना सांगितले. नातेवाईकांनी यासंदर्भात प्रियांकाची समजूत घातली. असे करणे योग्य नसल्याचे सांगून नातेवाईकांनी पुन्हा प्रियंकाला सासरी पाठवले. दरम्यान प्रियांका बेपत्ता झाल्याचे तिच्या सासरच्या मंडळींनी माहेरच्या मंडळींना सांगितले. याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली. आणि या तक्रारीनंतर तब्बल ११ वर्षांनी खून प्रकरण उघडकीस आले आहे. 

एकेदिवशी प्रियांका दानेश्वरीच्या पतीने दारूच्या नशेत दानेश्वरीचा खून झाल्याचे सांगितले. सुरुवातीला नशेत बोलत असल्याचा अंदाज व्यक्त झाला मात्र त्यानंतर पोलीस चौकशीदरम्यान हि बाब उघड होऊन दानेश्वरीचा खून झाल्याचे उघडकीस आले. दानेश्वरीच्या वडिलांनी ७ जुलै २०२२ रोजी खुनाची तक्रार दाखल केली होती. या करणाचा तपास करताना पोलिसांना अधिक माहिती मिळाली. २४ जुलै २०११ रोजी भाड्याच्या कार मधून दानेश्वरीचा पती हुचाप्पा आणि भाऊ सिद्दनगौड यांनी देवदर्शनाला जाण्याचा बहाणा करून दानेश्वरीला नायलॉनच्या दोरीने बांधून तिचा मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळून घनदाट जंगलात विवस्रपणे टाकून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. 
सुमारे ११ वर्षांपूर्वी झालेला खून एखाद्या चित्रपटाच्या कहाणीप्रमाणे उघडकीस आला आहे. समाजात मान सन्मान कमी होईल या भीतीने दानेश्वरीच्या पालकांनी तक्रार देण्यास टाळाटाळ केली. मात्र आपल्या मुलीचा इतक्या निर्घृण पद्धतीने करण्यात आलेल्या खुनाच्या माहितीपासून पालक वंचित राहिले. सुमारे ११ वर्षानंतर या खुनाचा उलगडा झाला असून विजापूर पोलिसांनी या खून प्रकरणातील प्रियांका दानेश्वरीचा पती हुचाप्पागौड पाटील, तिचा दीर सिद्दनगौड पाटील तसेच कारचालक उमेश कमलापूर या तिघांना अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.


Recent Comments