पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील धबधबे आता ओसंडून वाहू लागले आहेत. गोकाक फॉल्स म्हणून जगप्रसिद्ध असलेला गोकाकचा धबधबाही आता शुभ्र दुधाळत्या फेसाळ लाटांनी पर्यटकांना आकर्षित करू लागलाय. विकेंडमुळे आज गोकाक फॉल्स पाहण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती.


होय, रविवारी वीकेंड असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने गोकाक फॉल्स येथे दाखल झाले होते. दुचाकी, चार चाकी, रिक्षा अशा मिळेल त्या वाहनांनी येऊन पर्यटकांनी गोकाक फॉल्स येथे आज हजेरी लावून नयनरम्य गोकाक धबधब्याचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवून घेतले. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणीही दूरवर येऊ नये यासाठी पोलिसांनी कडक सूचना दिल्या आहेत. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून खबरदारी घेतली आहे.


Recent Comments