Gokak

जलमय गोकाक-शिंगळापूर पुलावरून धोकादायक प्रवास

Share

मुसळधार पावसामुळे पूर आलेला असूनही गोकाकशिंगळापूर पुलावरून दुचाकीस्वार कोणतीही भीती बाळगता जात आहेत. जीवाची पर्वा करता पाण्यात बुडालेल्या पुलावरून धोकादायक प्रवास करत आहेत.

मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या गोकाक-शिंगळापूर पुलावरून वाहने आणि दुचाकीस्वार न घाबरता ये-जा करत आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे हा पूलही बुडाला आहे. बुडालेल्या पुलावर वाहने उभी केल्यानंतर लोक वाहने धुत असल्याचे दृश्य व्हायरल झाले आहे. आता बाईकस्वार बिनदिक्कत बुडालेल्या पुलावरून धावत आहेत. दुचाकी घसरून चालकाला नदीत पडून आपला जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे. असा अनर्थ घडण्यापूर्वी बेळगाव जिल्हा प्रशासनाला जागे होणे गरजेचे आहे. पुरेशी सुरक्षा पुरविण्यासह जनजागृती केली पाहिजे.

Tags: