Belagavi

भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांनी विध्यार्थ्यांसाठी केली बसची व्यवस्था : BJP leader Dhanshree SarDesai arranged bus for college students

Share

भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांनी वेळेवर बस सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी बसेसची व्यवस्था करण्याचे मोठे काम केले आहे.

खानापूर तालुक्यातील अनेक गावातील विद्यार्थी रोज खानापूर, बेळगाव येथे शिक्षणासाठी जातात. सकाळी त्यांना निर्धारित ठिकाणी जाण्यासाठी बस मिळाली तरी संध्याकाळी कॉलेज संपवून घरी पोहोचताना त्यांना बस नसते हा विरोधाभास आहे.

दुपारी १२ वाजता कॉलेज संपल्यानंतर घरी परतण्यासाठी धडपडत असलेल्या विद्यार्थ्यांची अवस्था पाहून भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनश्री सरदेसाई जांबोटाकर यांनी खानापुर आगार व्यवस्थापक महेश तिरकन्नावर यांच्या निदर्शनास ही बाब आणून बसची व्यवस्था करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत तिरकन्नावर यांनी बस सुविधा उपलब्ध केली. दुपारी बारा वाजता बेळगाव-कणकुंबी आणि खानापूर-देवराई अशा दोन बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा फायदा खानापूर येथील नंदगड, हलशी, देवराई या गावातील विद्यार्थ्यांना तसेच बेळगाव व कणकुंबी मार्गावरच्या गावातील विद्यार्थ्यांना होणार आहे. आगार व्यवस्थापक तिरकन्नावर तसेच भाजप नेत्या धनश्री सरदेसाई जांबोटकर यांनी विद्यार्थी व जनतेच्या समस्यांची दखल घेतल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Tags: