ईडीचा दुरुपयोग करून केंद्र सरकार राहुल गांधी आणि सोनिया गांधी याना त्रास देत असल्याचा आरोप करून हुबळीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज जोरदार निदर्शने केली. नवनगर येथील प्राप्तिकर खात्याच्या कचेरीला घेराव घालण्याचा प्रयत्न निदर्शकांनी केला.

केंद्र सरकारच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढून काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवनगर प्राप्तिकर खात्याच्या कचेरीला घेराव घालण्याचा प्रयत्न शुक्रवारी सकाळी केला. प्राप्तिकर, अमलबजावणी संचलनालय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केंद्र सरकार काँग्रेस आणि नेत्यांना अडचणीत आणण्याचा डाव रचल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केला. सरकारच्या विरोधात जोरदार नारे देत निदर्शक कार्यकर्त्यांनी प्राप्तिकर खात्याच्या कचेरीला टाळे ठोकण्याचा यावेळी पोलिसांनी १००हुन अधिक कार्यकर्त्यांना अटक केली. काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष अल्ताफ हळ्ळूर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिलकुमार पाटील यांच्यासह अनेक नेते-कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. केंद्र सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना त्रास दिल्याचा आरोप निदर्शक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
Recent Comments