शालेय पाठ्यपुस्तकातील चुका तातडीने दुरुस्त कराव्यात अशी मागणी निडसोशी जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी केली.

जागतिक लिंगायत महासभा, राष्ट्रीय बसव दल, सेना, लिंगायत धर्म महासभा, वचन साहित्य परिषद आणि बसवण्णा अभिमान्यांनी मंगळवारी हुक्केरीत पाठयपुस्तकात बसवण्णा यांच्याविषयी चुकीची माहिती दिल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. त्यावेळी निदर्शकांना संबोधित करताना शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी शालेय पाठयपुस्तकात बसवण्णा यांच्याविषयी चुकीची मशिदी दिल्याबद्दल तीव्र खेद व्यक्त केला. याच्या निषेधार्थ हुक्केरी तालुक्यातील सर्व मठाधीश, स्वामीजी, लिंगायत नेत्यांनी निदर्शने करून चुका दुरुस्तीच्या मागणीसाठी तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर कोर्ट सर्कलपासून स्वामीजी आणि ;इंगायत समाजबांधवांनी मिनी विधानसौधवर निषेध मोर्चा काढला. तेथे तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी हत्तरगी कारीमठाचे गुरुसिद्धगडेश्वर स्वामीजी, काशिनाथ सिद्धेश्वर महास्वामीजी, गुरुराचोटी स्वामीजी, यरनाळ ब्रह्मानंद अज्जा, शिवबसव स्वामीजींसह लिंगायत समाज नेते महांतेश चौगला, एस. वाय. हंजी, विजय रवदी, बसवराज पाटील, काडप्पा मगदुम, राजू नाशिपुडी, चंदू गंगन्नावर, बसवराज कराळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
Recent Comments