हिंदवी स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा आज 6 जून राज्यभिषेक दिन. यानिमित्त छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथील श्री शिवरायांच्या पुतळ्याला कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार मनोहर कडोलकर, मराठा बेळगांव जिल्हा अध्यक्ष कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन प्रमुख वैभव विलास कदम, नवनिर्वाचित पदाधिकारी सचिन कोले, बसू लाड, राहुल भातकांडे, राजू सांबरेकर, गणपत पाटील, व वामन कदम यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती श्री शिवराय यांची आरती करून राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या सन्मानार्थ गगनभेदी घोषणा दिल्या. या वेळी कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते.



Recent Comments