Gokak

Control the plague of agents in Gokak RTO office :गोकाक आरटीओ कार्यालयात एजंटराज एजंटगिरीवर नियंत्रण मिळविण्याचा आगह

Share

गोकाक आरटीओ कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट सुरु आहे. या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांकडून अधिक पैसे वसूल करण्यात येत आहेत. आरटीओमधील कामांसाठी लाच मागण्यात येत असून या साऱ्या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्नाटक रक्षण वेदिका गोकाक विभाग यांच्यातर्फे आंदोलन छेडण्यात आले.

व्हॉइस : गोकाक मधील आरटीओ कार्यालयातील एजंटांविरोधात दिवसेंदिवस तक्रारी वाढत चालल्या असून जनतेकडून अधिक पैसे वसूल करण्यात येत असल्याचे आरोपही होत आहेत. लायसन्स, गाडीचे रजिस्ट्रेशन या साऱ्या गोष्टींसाठी सर्वसामान्य जनतेची लूट सुरु आहे. हा प्रकार थांबिन्यात यावा, यासाठी गोकाक मधील कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामगौडा गटातर्फे आंदोलन छेडण्यात आले.

यासंदर्भात माहिती देताना शिवरामगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी गोकाक आरटीओ कार्यालयात सुरु असलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला. लायसन्स काढण्यासाठी २००० रुपये आकारण्यात येत असून एजंटांकडून सुमारे १५००० रुपयांची मागणी करण्यात येत आहे. हा दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नसून जनतेला याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे आरटीओ विभागाने एजंटराजवर नियंत्रणात आणण्यासाठी पाऊले उचलावीत, असा आग्रह यावेळी करण्यात आला. (

यावेळी कर्नाटक रक्षण वेदिकेचे शिवरामगौडा गटाचे जिल्हाध्यक्ष वाजिद हिरेकुडी, गौस सनदी, रेशमा कित्तूर, ताहीर मल्लिका वांगी, अकबर सडेकर, कस्तुरी बावी, अंबिका रैमान मुकाशी, युसूफ शीगीहळ्ळी आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: