hubali

Punchamsali Protest: आरक्षणाच्या मागणीस्तव पंचमसाली समाजाचे आंदोलन

Share

Punchamsali Protest: पंचमसाली समाजाला राज्य सरकारने २ ए श्रेणीत समाविष्ट करावे, तसेच केंद्र सरकारने ओबीसी आरक्षण जाहीर करावे, अशी मागणीस्तव कुंदगोळ तालुक्यातील लिंगायत पंचमसाली समुहाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.

कुडलसंगम पंचमसाली पिठाचे बसवजय मृत्युंजय स्वामींच्या नेतृत्वाखाली गाळी मरेम्मादेवी देवस्थानपासून तहसीलदार कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचमसाली समाजाला राज्य सरकारने २ ए श्रेणीत समाविष्ट करावे, तसेच केंद्र सरकारने ओबीसी आरक्षण जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली.

यावेळी कुडलसंगम पंचमसाली पिठाचे बसवजय मृत्युंजय स्वामी बोलताना म्हणाले, आपला सरकारवर दृश्य विश्वास आहे. बसवराज बोम्मई यांनी शब्द दिला आहे. येडियुरप्पांनी आपली साथ न सोडण्याचे वचन दिले आहे यावर देखील आपला विश्वास आहे.परंतु गेल्या २ महिन्यात कोणताही प्रतिसाद देण्यात न आल्याने आताच आपली साथ सोडण्यात आल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने २ ए श्रेणीत समाविष्ट करावे, तसेच केंद्र सरकारने ओबीसी आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी अनेक आंदोलने करण्यात आली, उपोषण करण्यात आले. आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आपण उपोषण करणार असून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा बसवजय मृत्युंजय स्वामींनी दिला.

पंचमसाली समाजाला तातडीने आरक्षण जाहीर करावे, आरक्षण कधी जाहीर होणार याची तारीख सांगावी किंवा हे दोनशे शक्य नसल्यास आपण दिलेला शब्द चुकीचा असून आपल्याला क्षमा करावी, असे जाहीरपणे कबुल करावे, अशा तीन अटी सरकारसमोर ठेवण्यात आल्या आहेत, असेही बसवजय मृत्युंजय स्वामी म्हणाले.

या आंदोलनात अरविंद कटगी, एस आय चिक्कनगौडर, जगदीश पाटील आदींसह शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते.

Tags: