Gokak

राज्यातील मूर्खपणा दूर साकारण्यात सरकार अपयशी ; आमदार सतीश जारकीहोळी यांची सरकारवर बोचरी टीका

Share

रामनगर तालुक्यातील देवरदोड्डी या गावात झालेल्या घटनेचा निषेध करत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी सरकारवर टीका केली.

गोकाक येथील हिल गार्डन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे. देवरदोड्डी गावात पिढ्यान पिढ्या स्त्रियांच्या मासिक धर्मासंदर्भात तसेच बाळंतीण महिलांसंदर्भात चुकीच्या प्रथा पाळण्यात येत आहेत. अशा प्रथा इतर देशात कुठेच नाहीत. केवळ भारतातच अशा प्रथा पाळल्या जातात. हा मूर्खपणा वेळीच थांबविणे गरजेचे होते मात्र हे थांबविण्यात सरकार अपयशी ठरले असून अनेक भागात असे प्रकार सर्रास घडत आहेत. अशा घटनांचा आपण निषेध करत असल्याचे जारकीहोळी म्हणाले. ()

परदेशात असे मूर्खपणाचे प्रकार आढळून येत नाहीत. देशातील अनिष्ट प्रथांमुळे समाजाला तडा जातो. अशा प्रथा मुळापासून उच्चाटण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे. राज्यात अजूनही अशांततेचे वातावरण आहे. आणि हे सर्व हाताळण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सतीश जारकीहोळी यांनी केला. ()

देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना अशा प्रथांनी डोके वर काढणे हि आजच्या घडीला निंदनीय अशीच बाब आहे. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून अनेक विकासात्मक घटना समोर येत आहेत. परंतु अशा प्रकारच्या प्रथा आजदेखील ग्रामीण आणि दुर्गम भागात पाळल्या जातात याचाच खेद समाजमाध्यमांमध्ये व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध करत सतीश जारकीहोळी यांनी सरकारवर देखील रोष व्यक्त होत आहे.

Tags: