Gokak

अरभावी येथे सरकारी योजनांचे उदघाटन आमदारांच्या सचिवांकडून

Share

अरभावी मतदार संघात सरकारी योजनांच्या कामकाजाचे आमदारांऐवजी त्यांच्या आप्त सचिवांकडून उद्घाटन करण्यात आले. यासाठी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी काँगेस नेते लक्ष्मण सवसुद्दी यांनी केली.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी आप्त सचिवांची नेमणूक केली आहे. विविध योजनांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या इमारतींचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते होत आहे. याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून आमदारांऐवजी त्यांच्या सचिवांकडून का कामे केली जात आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमदारांऐवजी सरकारी योजनांचे उद्घाटन इतरांनी करणे हे नियमबाह्य असून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अरभावी मतदार संघातील अशा घटनांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सवसुद्दी यांनी दिला.

याचप्रमाणे रमेश उटगी बोलताना म्हणाले, आमदारांना विकासाबद्दल आसक्ती नाही. नव्याने रचना करण्यात आलेल्या मूडलगी तालुक्यात विवीध विभागांची कार्यालये अद्याप सुरु करण्यात आली नाहीत. येथील विकासकामांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ()

यावेळी एम टी पाटील, बी बी हंदीगुंद आदी उपस्थित होते.

Tags: