Gokak

कोळवी ग्रामपंचायतीने टेंडर नियम बसवले धाब्यावर

Share

संपूर्ण राज्यात टेंडर आणि कमिशन प्रकरणी झालेले संतोष पाटील आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच गोकाकमधील कोळवी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात झालेल्या कामकाजासंदर्भात आणखी एक तक्रार पुढे आली आहे. टेंडर मिळाल्याशिवाय कोणतेही कामकाज न करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला असून हा आदेश आणि नियम पायदळी तुडविल्याचा प्रकार कोळवी येथे झाला आहे.

राज्यात निविदा मागविल्याशिवाय कंत्राटदारांना काम करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले असूनही गोकाक तालुक्यातील कोळवी ग्रामपंचायतीने निविदेसंदर्भातील नियम आणि आदेश पायदळी तुडविले आहेत. कोळवी येथे झालेल्या कामकाजाची माहिती ग्रामस्थांनी पंचायत कर्मचाऱ्यांना विचारली. यावेळी कर्मचाऱ्यांनी सदर कामकाज १४व्या वित्त आयोग योजने अंतर्गत झाल्याचे सांगितले. २ ते ३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र या कामकाजाची निविदा देण्यात आली नसून निविदा मागविण्या आधीच हे कामकाज करण्यात आले आहे. शिवाय हे कामकाज निकृष्ट दर्जाचे झाले आहे, अशी तक्रार ग्रामस्थ करीत आहेत. ()

राज्यात अपूर्ण निविदा प्रक्रिया आणि कमिशन प्रकारातून संतोष पाटील आत्महत्या प्रकरण पुढे आले. असे प्रकार यापुढील काळात घडू नयेत यासाठी शासनाने आदेश देखील जाहीर केला. मात्र अद्यापही काही ठिकाणी हा आदेश आणि नियम पायदळी तुडवण्याचा प्रकार सुरु आहे, याची प्रचिती कोळवी गावात येत आहे. याप्रकरणी तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करेल, हे पाहणे गरजेचे आहे.

Tags: