निपाणी शहरात जोल्ले उद्योग समूहातर्फे शिव–बसव जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.

होय, छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त निपाणीत जोल्ले उद्योग समूहातर्फे भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध कलापथकांनी मिरवणुकीत सहभागी होऊन आपल्या कलाकौशल्याचे प्रदर्शन घडविले. शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धकलेचा भाग असणाऱ्या लाठीमेळा, दांडपट्टा आदी साहसी प्रकारांचा यात समावेश होता. उत्कृष्ट सादरीकरणाने कलाकारांनी सर्वाना खिळवून ठेवले. अनेक उत्सव मंडळांनी छत्रपती शिवाजी आणि बसवेश्वरांच्या जीवनावर आधारित प्रसंगांचे सजीव देखाव्यातून सादरीकरण केले. मिरवणुकीसाठी खास हत्ती आणण्यात आला होता. त्यावर बसून सवारीचा आनंद बच्चे कंपनीने लुटला.


धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले आणि चिक्कोडीचे खा. अण्णासाहेब जोल्ले यांनी शहरातील छत्रपती शिवाजी चौकात शिवरायांच्या आणि बसवेश्वरांच्या पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीचे उदघाटन केले. यावेळी बसवप्रसाद जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, चंद्रकांत कोठीवाले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments